Monday, April 14, 2008

देवनागरी आणि मराठी

मला बराहा लिपि मिल्याला पासून बर्याचदा मराठीत लिहायाची इच्छा होते। आज अशीच इच्छा झाली आणि एक शाळेत शिकालेली कविता लिहायचे ठरवले। ती कविता अशी

रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा ॥ध्रु॥

मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना
विसरूनी गेलो पतंग नभीचा विसरूनी गेलो मित्राला
पाहूनी तुजला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा ॥१॥

हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजुला सरसरती
निळनिळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी फुलती रे
उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपूनी गेले रे ॥२॥

पहाटवेळी आभाळ येते लहान होऊनी तुझ्याहूनी
तुला भरवीते निळ्या करांनी दवमोत्याची कणी कणी
गोजिरवाणा तो रवीचा कर छाया होते इवलीशी
तुझ्यासंगती लपून खेळती रमून जाती पहा कशी ॥३॥

वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इउली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला
मलाही वाटे लाहन होऊन तुझ्याहूनही लहान रे
तुझ्यासंगती सदा रहावे विसरूनी शाळा घर सारे ॥४॥

आता असेच मधून मधून इथे काही लिहिन।

होपेफुल्ली मला इंग्लिश मध्ये लिहिता येइल। आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देता येतील

No comments: